अनिल देशमुख यांनी मुलगी व पत्नीची हत्या करुन केली आत्महत्या

0
13

अनिल देशमुख यांनी आपल्या 16 वर्षीय मुलीची व पत्नीची हत्या करून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुका येथे उघडकीस आली आहे

भामोद येथील रहिवासी अनिल देशमुख (45) यांनी पत्नी वंदना देशमुख (40) आणि मुलगी साक्षी अनिल देशमुख (16) या दोघींची हत्या करून गळफास घेऊन आत्महत्या केली , घरातून दुर्गंधी येत असल्याने शेजार्‍यांनी पोलिसात तक्रार केली असता पोलिसांनी घराची तपासणी केली असता अलमारी ला मुंग्या लागलेला दिसल्या उघडली असता आलमारीत वंदना चा मृतदेह आढळला, अधिक पाहणी केल्यावर मुलगी साक्षी चा मृतदेह पलंगाखाली आढळला

घराच्या मागच्या खोलीत अनिल देशमुख गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आले, वैद्यकीय तपासणी केली असता ते मृत झाल्याचे निदर्शनास आले

मागील अनेक दिवसांपासून देशमुख कुटुंबात वाद सुरू असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासणीत समोर आले आहे, पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here