वाशिम जिल्ह्यातील आज ३ जुलै लसीकरण विषयी माहिती

0
9

वाशिम जिल्ह्यातील सर्व जनतेस आव्हान करण्यात येत आहे की, उद्या, ३ जुलै २०२१ रोजी जिल्ह्यातील सर्व प्रा.आ.केंद्र, ग्रामीण रुग्णालय व जिल्हा सामान्य रुग्णालय वाशीम या ठिकाणी लसीकरण सत्र असेल. यामध्ये १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जाईल. कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस केवळ ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी उपलब्ध आहे.

वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालय येथे दोन्ही लसींचे केवळ दुसरे डोस उपलब्ध असतील.

१८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींनी सर्व लसीकरण केंद्रावर ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करून अपॉईंटमेंट बुक करावी. यासाठी आज, २ जुलै रोजी रात्री ठीक ९ वाजता उपरोक्त सर्व केंद्रावरील नोंदणी प्रक्रिया सुरु होईल. त्यामुळे लसीकरण घेण्यास ऑनलाईन पद्धतीने अपॉईंटमेंट बुक करूनच लसीकरण केंद्रावर जावे. जेणेकरून लसीकरण केंद्रावर गर्दी होणार नाही व कोविड -१९ नियमांचे उल्लंघन होणार नाही.

ऑफलाईन पद्धतीने फक्त ४५ वर्षावरील व्यक्ती, अपंग व्यक्ती, बेघर व्यक्ती तसेच दुसऱ्या डोससाठी पात्र व्यक्ती यांनाच प्राधान्य राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here