अमरावती/अकोला दिनांक 28 जून ( प्रतिनिधी)
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री जनरल व्ही के सिंह जी आणि अधिकाऱ्यांसोबत अमरावती व अकोला विमानतळांसंदर्भात उच्चस्तरीय बैठक घेतली.
भविष्यातील गरज लक्षात घेता प्रवासी आणि मालवाहक विमानांसाठी मोठी धावपट्टी आणि ॲाल वेदर टेक ॲाफ/लॅंडिग सुविधा करण्याच्या सूचना गडकरी यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा, आ. वसंत खंडेलवाल, आ. राजेंद्र पाटनी बैठकीस उपस्थित होते.






