नागपूरच्या कलाकारांनी सजलेला आम्ही बटरफ्लाय या चित्रपटाचे पोस्टर ट्रेलर गाणे नागपुरात रिलीज

0
16

नागपूर दिनांक 27 जून ( महानगर प्रतिनिधी)

नागपूरच्या राजेश रंगारी द्वारा निर्मित आम्ही बटरफ्लाय या मराठी चित्रपटाचे पोस्टर, ट्रेलर व गाणे वसंतराव देशपांडे येथे झालेल्या कार्यक्रमात माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते व चित्रपटातील कलावंत अभिनेता गिरीष परदेशी व अभिनेत्री आकांक्षा गाडे हयांच्या उपस्थितीत रिलीज करण्यात आले

या वेळी चित्रपटाचे निर्माते राजेश रंगारी व दिग्दर्शक अनिकेत लिमजे व श्रीनिवास शिरास यांच्यासह चित्रपटात अभिनय केलेले नागपुरातील कलावंत प्रामुख्याने उपस्थित होते

पोस्टर ट्रेलर व गाणे रिलीज केल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्कृष्ट सामाजिक चित्रपट निर्मिती केल्याबद्दल राजेश रंगारी यांचे कौतुक केले नागपुरात लवकरच फिल्म सिटी उभारण्याचा मानस ही त्यांनी यावेळी बोलून दाखविला

“आम्ही बटरफ्लाय” हा चित्रपट  नागपूर विदर्भातील बाल-कलाकारांना घेऊन निर्माण केलेला असून  ह्या चित्रपटाचे  दिग्दर्शन अनिकेत लिमजे व श्रीनिवास शिरास यांनी केले आहे.

विदर्भातील बाल कलाकारांचे कला गुणांना वाव मिळावा म्हणून “राज किएशन्स मिडीया” च्या वतीने (राजेश रंगारी निर्मीत) “यांनी ” आम्ही बटरफ्लाय ” चित्रपट निर्मीत केला आहे.

विशेष म्हणजे “बालसदन आश्रम” अनाथ मुलांच्या आश्रमात राहून व जिल्हा परिषद शाळेत शिकणारा साहील केणे हा चित्रपटाचा केंद्र बिंदू आहे. प्रशांत हाडके यांच्या मार्गदर्शनात तो पुढची वाटचाल करीत आहे.

या चित्रपटात नागपुरातील पूर्वा मानकर, उर्वेश पोटफोडे, अर्णव देशपांडे यांनी  अभिनय केला आहे. एकंदरीत मुलांसाठी मुलांनी मांडलेला सिनेमा सिनेरसिकांच्या भेटीस  येत असून 26 ऑगस्टला महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here