गेल्या 24 तासात चार कोरोना पॉझिटिव्ह

0
14

यवतमाळ दि 24 जून (प्रतिनिधी ) :-

गेल्या 24 तासात यवतमाळ जिल्ह्यातील चार महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. यात बाभुळगाव तालुक्यातील एक, यवतमाळ दोन व इतर जिल्ह्यातील एका रूग्णांचा समावेश आहे.

जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 411 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी चार अहवाल पॉझिटिव्ह असल्याने उर्वरित 407 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 79110 आहे. तर काल एक जण बरे झाल्याने आतापर्यंत बरे झालेल्यांची एकूण संख्या 77277 झाली आहे.

ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात 27 व बाहेर जिल्ह्यात तीन अशी एकूण 30 झाली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1803 मृत्यूची नोंद आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत आठ लाख 79 हजार 633 चाचण्या झाल्या असून त्यापैकी आठ लाख 523 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 8.99 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 0.97 आहे तर मृत्यूदर 2.28 आहे.

नागरिकांनी कोरोना त्रीसुत्री नियमांचे पालन करावे, तसेच कोरोनाचा पहिला, दुसरा व तीसरा डोज घेवून संपुर्ण लसीकरण करावे व स्वत:ला सुरक्षीत करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here