आदित्य ठाकरे मोठ्या दुर्घटनेतून थोडक्यात बचावले, अधिकाऱ्यांसोबत मीटिंगमध्ये घडली दुर्घटना

0
8

आज संध्याकाळी राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे सह्याद्री अतिथीगृहावर पर्यटन मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत असताना स्लॅबसह मोठे झुंबर कोसळले अचानक झालेल्या या दुर्घटनेत कोणीही जखमी झालं नाही. मात्र ही दुर्घटना अत्यंत गंभीर होती आणि आदित्य ठाकरे थोडक्यात बचावलेे

हा अपघात बैठक सुरू असलेल्या सबागृहाच्या बाहेरच झाला. त्यामुळं या अपघाताच्या आधी नंतर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना आणि सर्व अधिकार्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आलं. बैठकीसाठी काही वेळापूर्वी आदित्य ठाकरे या ठिकाणाहूनच आत गेले असल्याची शक्यता आहे. त्यामुळं थोडा वेळ चुकला असता तर अपघाताची शक्यता होती. मात्र सुदैवानं तसं झालं नाही.

अपघात झाला त्याठिकाणचं बांधकाम हे 25 वर्षांपूर्वीचं आहे. या सर्व इमारतीचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलेलं आहे. त्या संपूर्ण इमारतीचा अहवाल मागवण्यात आला आहे. त्यानंतरच याबाबत प्रतिक्रिया देण्यात येईल असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. दरम्यान, संबंधित दुरुस्तीचं काम तातडीनं सुरू करण्यात आलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here