हवामान खात्याने यावर्षी देशात चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे त्यातही विशेषता विदर्भात चांगल्या पावसाचा अनुमान व्यक्त केल्याने विदर्भातील शेतकऱ्यांसाठी हे वर्ष पुन्हा चांगले ठरण्याचे चिन्ह दिसत आहे.
यंदा मान्सून काळात देशात सरासरीच्या १०१ टक्के तर विदर्भात १०६ टक्के पर्जन्यमानाची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.विदर्भातसुद्धा सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजाच्या ४ टक्के कमी अधिक प्रमाणात पाऊस होतो. त्यामुळे यंदा विदर्भात नक्कीच सरासरीपेक्षा अधिक पाऊस होणार असल्याचे चित्र आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.






