कोरोनापश्चात अनेक आजारांची गुंतागुत होत आहे.त्यात आता जीवघेण्या म्युकरमायकोसिसची भर पडलेली आहे. चेहऱ्याभवतीच्या हाडांच्या पोकळीत म्युकरमायकोसिस नामक बुरशी वाढत असून त्यामुळे डोळा प्रभावित झाला तर कायमचे अंधत्व येऊ शकते; मेंदू प्रभावित झाला तर प्रसंगी तो जीवघेणा ठरतो. कोरोनाच्या संसगानंतर सहा आठवङ्यांपर्यत म्युकरमायकोसिस होण्याची शक्यताअसते . त्यामुळे म्युकरमायकोसिस बुरशीचे वेळेत निदान होणे आवश्यक असल्याचे मत नेञरोग विषेतज्ञांनी व्यक्त केले आहे
*धोखा कुणाला*
1) कोरोना उपचारादरम्यान स्टिरॉइडचा वापर, ज्यांची ब्लड शुगर पातळी जास्त असणे.
2) रोगप्रतिकारशक्ति कमी असलेले
2) कोरोना काळात रूग्णालयात ‘ हाय फ्लो अॉक्सिजन थेरपी ‘ घेतली असल्यास
*अशी आहेत पूर्व लक्षणे*
1) डोकेदुखी
2) डोळे दुखणे
3)डोळ्याभवती सूज अथवा दुखणे
4)दृष्टी अंधूक होणे
5)दात दुखणे व हलणे
6)नाकातून काळा स्ञाव जाणे
7)हिरड्यांमध्ये वेदना
8)दोन दोन प्रतिमा दिसू लागणे (Diplopia)
*काय करायला हवे ?*
1) लक्षणे दिसू लागल्यास नेञरोग अथवा कान-नाक-घसा तज्झांचा सल्ला घ्यावा.
2)मधुमेह असलेल्या व्यक्तींनी रक्तातील साखरेचे प्रमाण नियमितपणे तपासावे.
3)शक्यतोवर एअर कंडिशनचा वापर टाळावा. दमट व ओलसर वातावरण टाळा.
4)वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष द्यावे.
5)मास्क नियमितपणे बदलावेत
6)डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य त्या तपासण्या तत्काळ करणे जेणे करून निदान लागण्यास उशीर होता कामा नये.
7)मधुमेह असलेल्या व्यक्तींनी कोरोनापश्चात एकदा तपासणी करून घेणे
*उपचार*
1)लक्षणे आढळल्यास तातडीने नेञरोग अथवा कान-नाक-घसा तज्झांचा सल्ला घ्यावा.
2)बुरशीविरोधी औषधे प्रारंभी टप्प्यात उपयोगी
3)प्रसार वाढल्यास शस्ञक्रिया हाच उपाय.
4)शस्ञक्रियेद्वारे संक्रमित भाग काढावा लागतो.
5) बुरशीमेंदूपर्यत पोहोचली तर जीवघेणी परिस्थिती निर्माण होते
6)वेळेत उपचार न केल्यास कायमचे अंधत्व येऊ शकते. त्यासाठी लवकर निदान होणे आवश्यक आहे.






