नागपूर जिल्हा परिषद चे सदस्य तथा स्थायी समिती सदस्य दिनेश रमेशचंद्र बंग यांनी त्यांना मिळणारे एक वर्षाचे मानधन मुख्यमंत्री कोविड सहायता निधीला दिले.
सद्या राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेन थैमान घातले असून दररोज हजारो नव्या रुग्णांची भर पडत आहे त्यामुळे आरोग्य यंत्रनेवार मोठा ताण निर्माण झाला आहे. अश्या परिस्तिथीत रुग्णांना योग्य आरोग्य सुविधा मिळाव्यात, म्हणून जिल्हापरिषद सदस्य दिनेश रमेशचंद्र बंग यांनी त्यांना जिल्हापरिषदेकडून मिळणारे वर्षभराचे मानधन कोविड रुग्णांच्या उपचारासाठी देत असल्याची घोषणा जिल्हापरिषदेच्या दिनांक ०५.०५.२०२१ ला झालेल्या स्थायी समितीच्या सभेत जाहिर केले.






