आजपासून देशात 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना लसीकऱणाचा पुढचा टप्पा सुरु होत आहे,त्यासाठी 5 कोटी 71 लाख, म्हणजे 6 कोटी साधारण संख्या होती. एक रकमी पैसे भरण्याचे आमचे नियोजन होते. मात्र लस देण्याचा पूर्ण अधिकार केंद्राने हाती घेतलाय आणि केंद्राने जर सुरुवातीला लस परदेशात पाठवली नसती तर आज लशीचा तुटवडा जाणवला नसता असे नमूद करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र आणि मोदींवर निशाणा साधला
कुंभमेळा आणि सार्वत्रिक निवडणुका यामुळे इतर राज्यात ही कोरोना बधितांचे प्रमाण वाढल्याचं अजित पवार म्हणाले. लसीकरणाच्या मुद्यावरून बोलताना अजित पवार यांनी म्हटलं की, सुरवातीला तयार होणारी लस दुसऱ्या देशात देण्याची गरज नव्हती त्यामुळे आपल्याला लसींची कमतरता भासली नसती, असे माझे स्पष्ट मत आहे असे अजित पवारांनी सांगितलेे






