उद्योगांना सर्व सोयीसुविद्या तत्परतेने द्याव्यात : जिल्हाधिकारी आर. विमला

0
11

नागपूर दिनांक 19 एप्रिल ( प्रतिनिधी)

उद्योगांना योग्य सर्व सुविद्या दिल्यास त्यांचा परिणाम उत्पादनक्षमता वाढीवर होईल, रोजगार निर्मिती होऊन बेरोजगारांना उत्पनाचे साधन मिळेल. याकडे प्राथ्यम्याने लक्ष देऊन सर्व यंत्रणांनी उद्योगांना सर्व सोयीसुविद्या तत्परतेने द्याव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी आर. विमला यांनी दिल्या. त्याचबरोबर उद्योगात प्राथम्याने स्थानिकांना प्राधान्य देण्यात यावेत, असेही त्यांनी सांगितले.

बुटीबोरी येथील बीएमए हॉल येथे जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने जिल्हा उद्योग मित्र समिती व स्थानिकांना रोजगार निर्मितीबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या.

बुटीबोरी मॅन्युफ्क्चरर्स असोशिएशनचे अध्यक्ष प्रदीप जयस्वाल, उद्योग विभागाचे सहसंचालक गजेंद्र भारती, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक शिवकुमार मुद्दमवार, कार्यकारी अध्यक्ष नितीन लोनकर, प्रशांत मेश्राम, असोशिएशनचे पदाधिकारी तसेच संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने या परिसरातील सांडपाण्याचे व्यवस्थापन करुन उद्योगास चालना मिळेल असे वातावरण तयार करावे. तसेच हिंगणा नगरपंचायतच्या मुख्याधिकाऱ्यांनी एसटीपी बाबतचा 10 कोटीचा प्रस्ताव प्रस्ताव त्वरित शासनस्तरावर पाठविण्याची कार्यवाही करुन त्याबाबत पाठपुरावा करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्यात.

डिफेन्सच्या जागेबाबतचा प्रश्न एमआयडीसी व जिल्हा उद्योग केंद्रांने संयुक्तिक विचार करुन सोडवावा. बुटीबोरी मफन्युफक्चरर्स असोशिएशने कामगारांना प्रशिक्षण देऊन पारंगत करावे. त्याचा परिणाम निश्चितच उत्पादन वाढीवर होईल, असे त्यांनी सांगितले.

ईसीस सोसायटीने कामगाराच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी नियमित सेवा देऊन हॉस्पीटल कडून टॉयअप करण्यासाठी अर्ज मागवावेत. कोरोना काळात जरी काम संथगतीने झाले असतील तरी आता त्यास गती दयावी. मल्टीस्टार हॉस्पीटल, चौधरी व माया हॉस्पीटलशी संपर्क साधून कामगारांच्या आरोग्याच्या समस्या तत्काळ सोडवाव्यात, अशा सूचना त्यांनी केल्या.

वाडी येथील सांडपाणी प्रक्रिया, अंबाझरी तलावातील गाळ काढणे, हिंगणा औद्योगिक क्षेत्रात टाकण्यात येणारा कचऱ्याचे व्यवस्थापन हिंगणा व वाडी येथील वाहतूक कमी करण्यासाठी बायपास रोड, एमआयडीसी हिंगणा येथे सीईटीपी स्थापन करणे, बुटीबोरी व हिंगणा सांडपाणी व्यवस्थापन, एमआयडीसी हिंगणा येथे ईसीस हॉस्पीटल सुरु करणे, कळमेश्वर औद्योगिक क्षेत्रातून जाणाऱ्या चौकातील वाढते अपघात, औद्योगिक क्षेत्रातील रस्तेदुरुस्ती तसेच उद्योगात स्थानिकांना रोजगार देणे आदी विषयांचा आढावा यावेळी जिल्हाधिकारी आर. विमला यांनी घेतला.

यानंतर त्यांनी तेथील नर्सरीची पाहणी करुन वृक्षारोपण केले. तसेच बेरोजगार उमेदवारांसाठी देण्यात येणाऱ्या प्रशिक्षण कक्षाची पाहणी केली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here