नागपूर दिनांक 10 एप्रिल ( प्रतिनिधी)
नागपुरात विमानतळावर (Nagpur airport) चोख सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. शरद पवार यांनी कार्यकर्त्यांकडून पुष्पगुच्छ स्वीकारले आहेत. मोठ्या संख्येने सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली. कुणालाही शरद पवार (Sharad Pawar) यांच्या जवळ जाऊ दिलं जात नाही.
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी (NCP activists) पवार यांची भेट घेतली. त्यानंतर शरद पवार हे गाडीत बसले. अमरावतीच्या दिशेने रवाना झालेत. नागपूर-अमरावती या मार्गावरही चोख सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी हल्ला झाला.त्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
पश्चिम विदर्भातल्या कार्यकर्त्यांचा हा मेळावा अमरावती येथे होत आहे.संघटनात्मक मजबुतीसाठी हा दौरा महत्त्वाचा मानला जातो. अमरावतीच्या दिशेनं गाड्यांचा ताफा रवाना झालाय. नागपूर ते अमरावती या रस्त्यावरी महत्वाच्या चौकात चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे. दोन दिवसांपूर्वी घडलेल्या अनुचित घटनेसारखी घटना घडून नये, यासाठी पोलीस तैनात आहेत.






