महाराष्ट्र दिनांक 5 एप्रिल ( प्रतिनिधी)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आजोबा झाले आहेत. अमित आणि मिताली ठाकरेंना पुत्ररत्नाचा लाभ झाल्याची माहिती मिळत आहे. सध्या बाळ आणि आई दोघेही सुखरुप असल्याची माहिती मिळत आहेत. (Raj Thackeray)
राज ठाकरे गेल्या चार दिवसांपासूनच चर्चेत आहेत. गुढी पाडव्याला केलेल्या भाषणानंतर राज ठाकरे पुन्हा एकदा चर्चेत आले होते. गडकरी यांनीही राज ठाकरे यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती
मनसेने यु-टर्न घेतला असल्याची चर्चा एका बाजूला होत असताना दुसऱ्या बाजूला मनसैनिक मशिदीबाहेर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसा लावण्याचा उपक्रम जोरदारपणे राबवत आहेत. एकंदरीत मनसैनिकांमध्ये गुढी पाडव्यानंतर उत्साहाचं वातावरण होतं. त्यानंतर आता ठाकरे कुटुंबियांमध्येही आनंदाचं वातावरण दिसून येत आहे. राज ठाकरे आजोबा झाल्यामुळे आता मनसैनिकही आनंदी झाल्याचं वातावरण आहे.






