शनिवारी आणि रविवारी सर्व लसीकरण केंद्र राहणार बंद

0
17

नागपूर, ता. 1 एप्रिल ( महानगर प्रतिनीधी)

नागपूर शहरातील मनपाच्या सर्व लसीकरण केंद्रांवरील लसीकरण शनिवार २ एप्रिल आणि रविवार ३ एप्रिल रोजी बंद राहणार आहे. मनपाच्या सर्व लसीकरण केंद्रावर १ एप्रिल २०२२ पासून कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन आणि कोर्बेव्हॅक्स या तिनही लस उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.

सोमवार, मंगळवार व बुधवार कोव्हिशिल्ड, गुरुवार व शुक्रवार कोव्हॅक्सीन आणि शनिवारी कोर्बेव्हॅक्स लसीकरणाचे दिवस निश्चित करण्यात आलेले आहेत. शनिवारी २ एप्रिल रोजी गुढीपाडवा आणि ३ एप्रिल रोजी रविवारी सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे सर्व केंद्रांवर कोणतेही लसीकरण होणार नाही, अशी माहिती मनपाच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे.

सोमवारपासून सुरळीतरित्या सर्व लसीकरण केंद्रांवर बुधवारपर्यंत कोव्हिशिडचे लसीकरण सुरू राहिल. त्यानंतर पुढील दोन दिवस कोव्हॅक्सिन आणि १२ ते १४ वर्ष वयोगटाचे लसीकरण शनिवारी होईल, याची नोंद घेण्याचेही आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here