बेडवर आढळलेले सव्वा लाख रूपये परत केले

0
12

आजच्या युगात पैश्यासाठी नाते संबंध टूटत अस्ताना ,थोड़या पैश्यासाठी खून झाल्याचे अनेक प्रसंग समोर येत अस्तानाच प्रामाणिकता जीवंत असल्याचे दाखले ही भेंटतात

असाच एक प्रामाणिकतेचा दाखला देणारा प्रसंग वर्धा जिल्ह्यातील सावंगी येथील शालिनीताई मेघे सुपर स्पेशिअलिटी रूग्णालयात घडल्याचं समोर आलं आहे.

येथील चतुर्थ श्रेणी कर्मचारी वृंदा चौधरी यांनी त्यांना रूग्णलयातील सफाई करताना, एका गादीवरील उशीखाली आढळून आलेले सव्वा लाख रुपये व घड्याळ रूग्णलाय प्रशासनाकडे सुपुर्द केले. नंतर समजले की नुकतेच निधन झालेल्या सुभाष राठी नावाच्या रूग्णाचे हे पैसे होते. संस्थेचे विश्वस्त सागर मेघे यांनी वृंदा चौधरी यांच्या या प्रामाणिकपणाची दखल घेत त्यांना दहा हजार रुपयांचे बक्षीस दिले. तर,अधीक्षक डॉ.संदीप श्रीवास्तव, मुख्याधिकारी डॉ.उदय मेघे, कुलगुरू डॉ.राजीव बोरले यांनी व्यक्तिशः त्यांचे कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here