यवतमाळ: लॉकडाउनमुळे सलून कारागीराची आत्महत्या

0
14

 

दुसऱ्या लाॅकडाऊन मुळे परत एकदा आपल्या कुटूंबाची उपासमारी होणार हे असह्य झाल्याने, न्हावी कारागीरा ने शेतात जाऊन फाशी घेऊन आपली जीवनयात्रा संपविली.

पिंपळखूटी येथील दिलीप बळीराम वाटकर वय वर्ष पंचावन्न हा न्हावी समाजातील उत्कृष्ट कारागीर राळेगांव येथे सुधाकर खेडेकर यांच्या सलून पार्लरमध्ये पाच वर्षां पासून काम करत होता.मागील वर्षीच्या लाॅकडाऊन मध्ये खूप हालअपेष्टा सोसून आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह भागविला.तीन महिन्या पूर्वी जावयाने आत्महत्या केली,हे शल्य,दु:ख मनात खदखदत असतांनाच, कोरोणा महामारी च्या वाढत्या रुग्णांमुळे दहा दिवसांपूर्वी प्रशासनाने कडक निर्बंध आणून पुन्हा एकदा लाॅकडाऊन सुरु केल्या मुळे दिलीप संपूर्ण पणे खचला आणि गुढीपाडव्या चे दिवशीच फाशी घेऊन आपली जीवनयात्रा संपविली.

व्यवसाय बंद च्या फटका बसणार हे गृहीत धरुन छोटे व्यवसायीक डबघाईस आले आहे. दिलीप च्या मागे वृध्द आई,पत्नी,दोन मुली,एक मुलगा असा आप्तपरीवार आहे…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here