महागाव येथील शिवभोजन केंद्राचा परवाना जिल्हाधिकाऱ्यांनी केला रद्द

0
19

यवतमाळ दि. 29 मार्च (प्रतिनिधी) :

महागाव येथील त्रिमूर्ती महिला बचत गटातर्फे चालविण्यात येणाऱ्या शिवभोजन केंद्राचा परवाना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज 29 मार्च 2022 रोजी तात्काळ प्रभावाने रद्द केला आहे.

जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील शिवभोजन केंद्रातून अस्वच्छ पद्धतीने शिवभोजन थाळी वितरीत करण्यात येत असल्याबाबत प्राप्त तक्रार व वृत्तवाहिनीवर प्रसिद्ध बातमीचे अनुषंगाने चौकशी करण्यात येवून वरील कार्यवाही करण्यात आली असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार यांनी कळविले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here