सार्थक फाउंडेशन तर्फे डॉ.गोवर्धनलाल पाराश यांचा सत्कार

0
15

हिंगणा दिनांक 27 मार्च ( प्रतिनिधी)

ऑस्टियोपॅथी उपचार प्रणाली द्वारा दुर्धर आजारांनी ग्रस्त असलेल्या देश-विदेशातील रुग्णांवर चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून उपचार करणारे जोधपुर राजस्थान येथील सुप्रसिद्ध डॉ.गोवर्धनलाल पाराश यांचा सार्थक फाउंडेशन नागपूर तर्फे सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

सार्थक फाउंडेशन नागपूर तर्फे हिंगणा येथे छोटेखानी कार्यक्रम घेऊन महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ.गोवर्धनलाल पाराश, व त्यांचे सहकारी डॉ. नंदकिशोर पाराश, डॉ. मधुसूदन पाराश,डॉ. श्यामसुंदर पाराश,व डॉ. सौरभ पाराश त्याच प्रमाणे संजीवनी सोशिओ मेडिकल फाउंडेशन वृद्धाश्रम व निसर्गोपचार केंद्राचे संचालक डॉ.संजय उगेमुगे यांचाही सत्कार करण्यात आला.

यावेळी वनराईचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष राजाभाऊ टाकसांडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नागपूर जिल्हा परिषदेतील गटनेते दिनेश बंग, सरिता उगेमुगे, डॉ.प्रमोद मुँधड़ा, डॉ. कमल भुतडा, डॉ. प्रमोद गांधी, डॉ. आशिष अग्रवाल, डॉ. दुर्गा बंग, डॉ, मुद्देश्वर, डॉ. खरे डॉ.अनुपमा आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन सार्थक फाउंडेशन चे महेश बंग, विनोद चतुर्वेदी, सुधीर बाहेती,संजय पालीवाल, अजय मल, विनय तापडिया यांनी केले होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here