महाराष्ट्र दिनांक 19 मार्च (प्रतिनिधी)
संपुर्ण विदर्भासह राज्यभरात उष्णतेची लाट पसरली आहे. उष्ण वाऱ्यामुळे तप्त झळा नागरिकांना सहन कराव्या लागत असून, एखाद्या तापत्या भट्टीप्रमाणे दुपार जाणवत आहे.
अनेक जिल्ह्यांमध्ये 40 पेक्षा जास्त कमाल तापमानाची नोंद झाली, तर किमान तापमानही १९.६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने पहाटेपासून उकाडा जाणवत आहे.पुढील आठवड्यात उष्णतेच्या लहरींची तीव्रता अधिक वाढण्याचा अंदाजही भारतीय वेधशाळेने वर्तविला आहे.
राज्यात चंद्रपूर सर्वांत तप्त
राज्यात चंद्रपूरमध्ये ४३ हे सर्वाधिक किमान तापमान नोंदविण्यात आले. यासह नागपूर ४०.८, जळगाव ४२.४, अकोला ४२.८, पभरणी ४०.९, औरंगाबाद ३९.५, महाबळेश्वर ३२.६, पुणे ३९.१, मुंबई ३२.६, कोल्हापूर ३९.५ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदविण्यात आले.
पुढील दोन दिवसांत उष्णतेची लाट वाढण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही जाणवेल. त्यामुळे राज्यात सर्वत्रच उकाडा वाढणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले.






