पोलिसांची धाड, 5 करोड चे 10 किलो सोने……..

0
8

अमरावती दिनांक 8 मार्च (प्रतिनिधी)

अमरावती पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पाच कोटी रुपयांचं १० किलो सोनं तसंच लाखोंची कॅश पोलिसांच्या हाती लागलीय. याप्रकरणी पोलिसांनी ३ आरोपींना अटक केली आहे.

शहरातील राजापेठ पोलिसांनी मध्यरात्रीच्या सुमारास दसरा मैदान येथील एका अपार्टमेंट मध्ये धाड टाकली. यादरम्यान पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

राजस्थान येथील तीनही युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरु आहे. त्यांच्याकडून ५ कोटी रुपयांचं १० किलो सोनं तसंच ५ लाख ३९ लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. आरोपींकडून कटरसह कच्च्या चिठ्ठ्या जप्त करण्यात आल्या आहे.

त्यांच्याकडे ठोस कागदपत्रे मिळून न आल्याने पोलिसांचा संशय बळावला आहे. त्यामुळे इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली असून पुढील तपास राजापेठ पोलीस करीत आहे.

गेल्या चार वर्षांपासून हे तीनही युवक अमरावतीतच राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून हे सोने चोरीचे आहे की हवाला मार्गाचे आहे याचा शोध पोलीस घेत आहे. दुसरीकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात सोनं सापडल्याने अमरावती शहरासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here