प्रेम प्रकरणातून १८ वर्षीय तरुणीची दगडाने ठेचून हत्या

0
12

यवतमाल दिनांक 4 मार्च (प्रतिनिधी)

प्रेम प्रकरणातून एका १८ वर्षीय तरुणीची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली असून युवकाने स्वत:च्या हाताची नस, गळा कापून आत्महत्येचा प्रयत्न केला.

ही खळबळजनक घटना शहरातील लोहारा एमआयडीसी परिसरात उघडकीस आली. आस्था सुरेश तुंबडे (१८) रा. गुरूमाऊली सोसायटी असे मृत तरूणीचे नाव असून, शुभम अशोक बाकल (२३) असे जखमी प्रियकराचे नाव आहे.

शहरातील लोहारा एमआयडीसी पॉवर हाऊस परिसरात एका तरूण गंभीर अवस्थेत रक्तबंबाळ स्थितीत परिसरातील नागरिकांना आढळून आला. यावेळी नागरिकांनी धाव घेवून विचारपूस केली असता, त्याने एक तरूणीची हत्या केल्याचे सांगितले. ही बाब नागरिकांना तातडीने लोहारा पोलिसांना दिली.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता लोहारा ठाणेदार दीपमाला भेंडे यांच्यासह अधिकारी, कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन प्रथम जखमी तरूणाला शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर तरूणीची शोधमोहीम राबविली. यावेळी त्या तरूणाने चक्क दगडाने ठेचून तरूणीची हत्या केल्याचे समोर आले.

यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी संपतराव भोसले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक प्रदीप परदेशी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी मृत तरूणी ही उमरसरा परिसरातील आस्था तुंबडे असल्याचं समोर आलं. प्रेम प्रकरणातून शुभम बाकल याने आस्थाची दगडाने ठेचून हत्या केली तर स्वत: हाताची नस कापत गळ्यावर ब्लेडने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here