राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर काल मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर आज भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी पवारांची भेट घेतली. नारायण राणे हे पत्नी नीलम आणि पुत्र आमदार नितेश राणे यांच्यासह पवारांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आले.
शरद पवार -अमित शाह यांच्यात अहमदाबाद येथे गुप्त भेट झाल्याची चर्चा सुरू अस्ताना नारायण राणे यांच्या या भेटीने महाराष्ट्र राजकारणात पुन्हा नवीन चर्चा सुरू झाली आहे





