गेल्या 24 तासात 124 पॉझिटिव्ह,152 कोरोनामुक्त ; एक मृत्यू

0
11

यवतमाळ दि. 25 जानेवारी (प्रतिनिधी) :

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1681 बेड उपलब्ध

* ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह 1868

 

गेल्या 24 तासात जिल्ह्यात 124 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले तर 152 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात 1840 व बाहेर जिल्ह्यात 28 अशी एकूण 1868 झाली असून त्यातील 77 रूग्ण रूग्णालयात तर 1791 गृहविलगीकरणात आहेत.

जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 1057 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 124 अहवाल पॉझिटिव्ह असल्याने उर्वरित 933 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 76023 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 72365 आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1790 मृत्यूची नोंद आहे. आज मृत झालेल्यांमध्ये यवतमाळ येथील 76 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे.

आज पॉझिटिव्ह आलेल्या 124 रूग्णांमध्ये 59 महिला व 65 पुरूष असून त्यात आर्णी तालुक्यात तीन, बाभुळगाव पाच, दारव्हा चार, दिग्रस सात, घाटंजी सात, मारेगाव एक, पांढरकवडा सहा, पुसद दोन, राळेगाव दोन, उमरखेड तीन, वणी 18, यवतमाळ 60 व इतर जिल्ह्यातील सहा रूग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत आठ लाख 12 हजार 749 चाचण्या झाल्या असून त्यापैकी सात लक्ष 36 हजार 494 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 9.35 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 11.73 आहे तर मृत्यूदर 2.35 आहे.

जिल्ह्यातील एक अहवाल ओमिक्रान पॉझिटीव्ह :

जिल्ह्यातून दरमहिण्याल कोरोना पॉझिटीव्ह आलेले 100 नमुने दिल्ली व 30 नमुने पुणे येथे असे एकूण 130 नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी दर महिण्यात पाठविण्यात येतात. त्यातील 13 जानेवारी रोजी दिल्ली येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेल्या नमुन्यापैकी एक अहवाल ओमीक्रॉन पॉझिटीव्ह आला असल्याची माहिती आरोग्य विभागाने आज दिली आहे. पाझिटिव्ह आलेला रूग्ण 28 वर्षीय पुरूष असून परदेशातून यवतमाळ शहरात आला होता. तपासणीचे वेळी या रुग्णाला कोरोनाची सौम्य लक्षणे होती. त्याची प्रकृती आता पुर्णपणे बरी झाली आहे.

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1681 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 7 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 1769 आहे. यापैकी 88 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 1681 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 80 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 707 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 755 बेडपैकी 8 बेड उपयोगात असून 747 बेड शिल्लक आणि 7 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 227 बेडपैकी पुर्ण 227 बेड शिल्लक आहेत.

कोरोना रुग्णसंख्येत सगळीकडे वाढ होत असून नागरिकांनी मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या कोरोना त्रीसुत्री नियमांचे पालन करावे, तसेच कोरोनाचे लसीकरण पुर्ण करून स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here