महाराष्ट्र दिनांक 24 जानेवारी (प्रतिनिधी)
मागील काही दिवसांमागून वादग्रस्त वक्तव्ये करत असल्याने राजकारणामध्ये (Politics) राळ उडवणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांची जीभ परत एकदा घसरली आहे. ज्याची बायको पळते, त्याचेच नाव मोदी ठरते, असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर करून त्यांनी परत एकदा नव्या वादाला तोंड फोडले आहे.
नाना पटोले यांनी नाशिक (Nashik) जिल्ह्यातल्या इगतपुरी (Igatpuri) येथे सुरू असलेल्या काँग्रेस (Congress) प्रशिक्षण शिबिराच्या समारोपाला हजेरी लावली होती. मात्र, जाता- जाता परत एकदा त्यांनीच आपल्याच वादग्रस्त वक्तव्याचा वाद क्षणाचा देखील वाट न बघता, त्यात परत एकदा एक काडी टाकली आहे. (nana patole bjp pm narendra modi Controversial statement)
नाना पटोले इगतपुरी येथे म्हणाले की, गावगुंडांना गावगुंडच दिसणार आहेत. त्यांची आता हलाखीची परिस्थिती झाली आहे. लोक भाजपवर हसत आहेत. ज्याची बायको पळते, त्याचे नाव मोदी ठरते, असे हे झाल्यावर आता काय बाकी राहिले आहे, असे म्हणत त्यांनी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकात पाटील यांच्यावर देखील टीका केली आहे.
पुढे नाना पटोले म्हणाले की, भाजप आणि शिवसेना यांची अनेक वर्षे मुंबई महापालिकेत सत्ता राहिली आहे. भाजप हा आमचा मुख्य शत्रू आहे. यामुळे आमची त्याच पद्धतीची भूमिका आणि रणनीती राहणार आहे, असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे.





