वाशीम (दिपक भारूका): महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे विभाग अमरावती मार्फत घेण्यात आलेल्या एसएससी एप्रिल 2021 परीक्षेमध्ये बाकलीवाल विद्यालयाचा 100% निकाल लागला आहे. सदर परीक्षेत शाळेतील एकूण 230 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी 90% पेक्षा जास्त मार्क मिळालेले एकुण 71 विद्यार्थी, प्राविण्य श्रेणीत 193 विद्यार्थी, प्रथम श्रेणीत 37 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तसेच शाळेतून प्रथम रितेश दत्ता लहाने 99.80%, शाळेतुन द्वितीय तन्वी संजय बेदरे 99.60%, शाळेतुन तृतीय रेणु जनार्धन बोंडे 99.40%, तसेच शाळेतुन चतुर्थ क्रमांक सायली विलास गोडघासे 99.20% हिने प्राप्त केला आहे.
या ऐतिहासिक यशाबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत असुन सर्व यशस्वी विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय शाळेचे अध्यक्ष अॅड. श सुरेन्द्रकुमार बाकलीवाल, मुख्याध्यापक बिल्लारी सर, उपमुख्याध्यापक दंभिवाल सर, पर्यवेक्षिका भोंडे मॅडम व सर्व शिक्षकवृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांना दिले आहे.






