वाशिम जिल्ह्यातील ८ जुलै रोजीचे लसीकरण विषयी माहीती

0
12

वाशिम जिल्ह्यातील सर्व जनतेस आव्हान करण्यात येत आहे की, उद्या, ८ जुलै २०२१ रोजी जिल्ह्यातील सर्व प्रा.आ.केंद्र, ग्रामीण रुग्णालय, वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालय इतर लसीकरण केंद्रांवर १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना कोव्हॅक्सिन आणि कोव्हीशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस उपलब्ध आहे. वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालय येथे दोन्ही लसींचे केवळ दुसरे डोस उपलब्ध असतील.

१८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींनी सर्व लसीकरण केंद्रावर ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करून अपॉईंटमेंट बुक करावी. यासाठी आज, ७ जुलै रोजी रात्री ठीक ९ वाजता उपरोक्त सर्व केंद्रावरील नोंदणी प्रक्रिया सुरु होईल. लसीकरण घेण्यास ऑनलाईन पद्धतीने अपॉईंटमेंट बुक करूनच लसीकरण केंद्रावर जावे. जेणेकरून लसीकरण केंद्रावर गर्दी होणार नाही व कोविड -१९ नियमांचे उल्लंघन होणार नाही.

४५ वर्षावरील व्यक्ती, अपंग व्यक्ती, बेघर व्यक्ती तसेच दुसऱ्या डोससाठी पात्र व्यक्ती यांनी ऑनलाईन बुकिंग करण्याची आवश्यकता नाही. सोबत येताना ओळखपत्र आणावे लागेल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here