महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त, वसईच्या सत्पाला येथील वृधश्रमात असणाऱ्या राज ठाकरे यांच्या शिक्षिका सुमनताई यांच्या हस्ते केक कापून मनसे सैनिकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी वृद्धाश्रमातील आजींनी डान्स करत आपला आनंद ही व्यक्त केला आहे.
राज ठाकरे यांच्या 53 व्या वाढदिवशी महाराष्ट्रात ठिकठिकाणी विविध सामजिक कार्यक्रम राबविण्यात आले
14 जून 2016 ला राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त घोटीच्या न्हायडी डोंगराच्या पायथ्याशी सॅमसोनाइट कंपनीच्या मदतीनं राजसैनिकांनी 490 विविध प्रकारच्या वृक्षांच्या रोपांची लागवड केली होती. आज पुन्हा मनसेकडून राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त या 490 वृक्षांची सजावट करून पूजा केली आणि दुर्गम भागातील आदिवासी पाड्यावरील चिमुकल्यांच्या हस्ते केक कापून त्या वृक्षांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.





