नुकतेच लग्न झालेल्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णी बाबत एक धक्कादायक वृत समोर येत आहे, तिच्या पुण्यातील घरी एका युवकानेे तिच्या वडिलांवर हल्ला केल्याचे समोर आले आहे.
सोनालीच्या निगडी येथील घरात घुसलेला तरूण तिचा चाहता आहे. सोनालीच्या बंगल्यात काल रात्री अचानक एक व्यक्ती दोरीच्या साहाय्याने बंगल्याच्या गॅलरीत शिरला. यावेळी सोनालीच्या वडिलांना या व्यक्तीला घरातून बाहेर जाण्यास सांगितले. मात्र, तो त्यांचे काहीही ऐकून घेण्यास तयार नव्हता. वारंवार त्यांनी त्याला बाहेर जाण्यास सांगितले. मात्र, ही व्यक्ती घरातून बाहेर पडण्यास तयार नव्हती. अचानक त्याने आपल्याजवळील चाकू काढून सोनालीच्या वडिलांवर हल्ला केला. यात त्यांच्या हाताला दुखापत झाली.
दरम्यान हा सर्व प्रकार लक्षात आल्यावर शेजाऱ्यांनी आणि इतर काही जणांनी त्या व्यक्तीला पकडण्याचा प्रयत्नही केला. मात्र, त्याचवेळी त्याने आपल्या जवळील मिरची पूड लोकांवर फेकली. अखेर या सगळ्या प्रकाराची जेव्हा पोलिसांना माहिती मिळाली तेव्हा पोलिसांनी तात्काळ त्याला अटक केली. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या व्यक्तीकडे चाकू आणि मिरची पूड होती हे पाहता तो व्यक्ती नक्की सोनालीचा चाहता होता की, चोरीच्या बहाण्याने तो त्यांच्या घरात घुसला होता? याचा देखील आता पोलीस तपास करत आहेत.





