18 ते 44 साठी सुरु राहणार
*नागपूर, ता. 2 :* नागपूर शहरातील ४५ वर्षावरील नागरिकांचे सोमवारी 3 मे रोजी मनपाच्या सर्व केंद्रावर लसीकरण होणार नाही, ही माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ संजय चिलकर यांनी दिली. लस उपलब्ध ना झाल्यामुळे लसीकरण होणार नाही. लस उपलब्ध झाल्या नंतर लसीकरण पुन्हा सुरु करण्यात येईल, असे ही त्यांनी सांगितले.
१८ वर्षावरील व्यक्तींचे लसीकरण मनपाद्वारे निर्धारित इंदिरा गांधी रुग्णालय गांधीनगर, पाचपावली सूतिकागृह व आयसोलेशन हॉस्पिटल इमामवाडा या तीन केंद्रांवर सुरू राहिल. विशेष म्हणजे १८ ते ४४ वर्ष वयोगटातील व्यक्तींना लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी झालेल्या व्यक्तींना लसीकरण केंद्रावरून जी वेळ देण्यात आली आहे त्याच वेळेत त्यांनी उपस्थित राहावे. केंद्रावर गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.






