नागपूर दिनांक 7 सप्टेंबर ( महानगर प्रतिनिधी)
संगीताचे जादूगार ‘पंचमदा’ म्हणून सुपरिचित असलेले आर. डी. बर्मन यांनी संगीतबद्ध केलेल्या सुमधूर गीतांनी ‘व्हीआयपीएलचा राजा’ गणेशोत्सवातली संध्याकाळ अधिक सुमधूर झाली.
विदर्भ इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेडच्यावतीने यंदा पहिल्यांदाच ‘व्हीआयपीएलचा राजा’ गणेशोत्सवाला प्रारंभ करण्यात आला असून गायत्रीनगरातील नागरिकांना त्यानिमित्ताने उत्कृष्ट सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी मिळत आहे.
मंगळवारी मनपा आयुक्त बी. राधाकृष्णन यांनी सहकुटुंब ‘व्हीआयपीएलचा राजा’ ची आरती केली. सकाळच्या सत्रात प्रफुल्ल गुडधे यांनी गणेशोत्सवाला भेट देऊन आरती केली.
सायंकाळच्या सत्रात ‘पंचम भावगीत संध्या’ हा संगीतमय कार्यक्रम सचिन व सुरभी ढोमणे यांच्या चमूने सादर केला. सुरभी ढोमणे, मुकुल पांडे, अजय मलिक, श्रीया मेंढी व डॉ. मनोज साल्पेकर यांनी एक अजनबी हसिना से, आज उनसे पहली मुलाकात, दो लब्जों की, प्यार दिवाना होता है, ये जो मुहोब्बत है, बाहों में चले आओ, चुरा लिया है, हम दोनों दो प्रेमी, क्या हुआ तेरा वादा अशी पंचमदा यांनी संगीतबद्ध केलेली एकाहून एक बहारदार गीते सादर करून रसिकांची वाहवा मिळवली.
सचिन ढोमणे, रघुनंदन परसटवार, अमर शेंडे, मनोज विश्वकर्मा, महेंद्र ढोले शिवलाल यादव, महेंद्र वाटुलकर व विक्रम जोशी यांनी गायकांना उत्तम साथसंगत केली.






