राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी घोषणा ! स्थानिक निवडणुकीत २७ टक्के ओबीसी उमेदवार देणार

0
12

महाराष्ट्र दिनांक 11 जुलै ( प्रतिनिधी)

येत्या काळात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं मोठी घोषणा केली आहे. या निवडणुकांमध्ये २७ टक्के ओबीसी उमेदवार देणार असल्याचं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केलं आहे.

पाटील यांनी म्हटलं, ओबीसी समाजाला न्याय मिळणं आमच्यासाठी सर्वाधिक महत्वाचं आहे. त्यामुळं येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकूण उमेदवारांपैकी २७ टक्के उमेदवार ओबीसी समाजाचे देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतला आहे

ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात न्यायालयीन निर्णयाच्या प्रतीक्षेत आपण सर्वच जण आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सनदशीर मार्गाने सर्व प्रयत्न केले आहेत व यापुढेही करत राहू, असंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here