नवीन दुकाची वाहनाकरीता नवीन मालिका सुरु

0
14

नागपूर दिनांक 11 जुलै ( महानगर प्रतिनिधी)

नवीन दुचाकी वाहनांकरीता नवीन मालिका 14 जुलैपासून सुरु करण्यात येत आहे.

नागरिकांना त्या वाहनाकरीता पसंती क्रमांक घ्यावयाचा असल्यास व आरक्षित करावयाचा असल्यास त्यांनी विहीत नमुन्यातील अर्ज पत्त्याचा पुरावा, फोटो ओळखपत्र, पॅनकॉर्ड व पसंतीचा नोंदणी क्रमांकासाठीच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर(पूर्व) यांचे नावे काढलेल्या फीच्या राष्ट्रीयकृत बँकेच्या धनाकर्षासहीत कार्यालयात स्वत: (नविन वाहन नोंदणी विभाग) येथे  13 जुलै रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 2.30 या कालावधीत सादर करावेत , असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नागपूर (पूर्व) यांनी केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here