गर्भपात कायदा उल्लंघनाची माहिती देणाऱ्यांना एक लाखाचे बक्षीस

0
14

यवतमाळ दि 24 जून (प्रतिनिधी) :-

राज्यात गर्भधारणा किंवा प्रसवपुर्व गर्भलिंग निदान तंत्र कायदा 1994 सुधारित 2003 व वैद्यकीय गर्भपात कायदा 1971 राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने गर्भपात केंद्रामध्ये वैद्यकीय गर्भपात कायद्याचे उल्लंघन होत असेल किंवा गर्भलिंग चाचणी करुन अवैधरित्या गर्भपात केले जात असतील किंवा अपात्र व्यक्ती गर्भपात करत असतील तर अशा केंद्राविषयी / व्यक्ती विषयी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यवतमाळ यांना कळवावी.

अशी माहिती देणाऱ्या व्यक्तीस त्यांनी दिलेल्या बातमीची खातरजमा करुन रुपये एक लाख बक्षीस देण्यात येईल. ती व्यक्ती सामान्य नागरिक, आरोग्य विभागातील कर्मचारी /अधिकारी तसेच इतर शासकीय व निमशासकीय कर्मचारी/अधिकारी अशी कोणीही असू शकेल. माहिती देणाऱ्या व्यक्ती बद्दल गुप्तता ठेवण्यात येईल.

तसेच गर्भधारणा पूर्व व प्रसवपूर्व लिंग निदान कायद्याचा भंग होत असल्याचे निदर्शनास आल्यास हेल्प लाईन क्र. 1800-233-4475 किंवा www.amchimulagi.gov.in या संकेत स्थळावर तक्रार नोंदवावी अथवा जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय,यवतमाळ यांना कळवावे, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश चव्हाण यांनी कळविले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here