भाजपासोबत जाणार का ? शरद पवार म्हणाले…..

0
13

महाराष्ट्र दिनांक 21 जून ( प्रतिनिधी)

राज्यात घडामोडींना वेग आला आहे. अश्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांना राष्ट्रवादी (NCP) भाजप (BJP) सोबत जाणार का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. तेव्हा शरद पवार मिश्किल हसले. अन् म्हणाले “सेन्सिबल प्रश्न विचारा…”

सध्या राज्यात राजकीय अस्थिरता पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे पक्षावर नाराज आहेत. शिवाय राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत जायचं नाही. भाजपसोबतच युती करायची असा प्रस्ताव शिंदे यांनी उद्धव ठाकरेंसमोर ठेवला.

अश्यात 2019 च्या पहाटेच्या शपथविधी अनेकांना आठवला. त्यामुळे राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार का? असा सवाल विचारण्यात आला. त्यावर शरद पवार मिश्किल हसले. “संवेदनशील प्रश्न विचारा…” , असं शरद पवार म्हणालेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here