महाराष्ट्रात राजकीय भूकंप,शिवसेना तुटण्याच्या मार्गावर,एकनाथ शिंदे 11आमदारासह….

0
16

महाराष्ट्र दिनांक 21 जून ( प्रतिनिधी)

महाराष्ट्र मध्ये राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून शिवसेना पक्ष तुटण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र समोर येत आहे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्ती एकनाथ शिंदे तेरा आमदारांसह सुरतला पोहोचले असून त्यांची भाजपा नेत्यांशी चर्चा झाल्याची माहिती समोर येत असून आणि दुपारी ते मोठी घोषणा करण्याची संभावना आहे

राज्यसभेनंतर विधान परिषद निवडणुकीतही भारतीय जनता पार्टीने महाविकास आघाडीला धक्का दिला आहे. भाजपाचे पाचही उमेदवार प्रचंड मतांनी निवडून आले आहेत.

पाचवा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपाकडे पुरेसं संख्याबळ नव्हतं. असं असूनही भाजपाने विजय खेचून आणला आहे. सत्ताधारी महाविकास आघाडीला हा खूप मोठा धक्का मानला जात आहे. महाविकास आघाडीचे अनेक आमदार फुटल्याची माहिती देखील समोर येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here