काटोल दिनांक 20 मई (प्रतिनिधी )
गुरुवारला रात्री साडे बाराच्या सुमारास काटोल तालुक्यातील येनवा, पारडसिंगा, कोंढाली, मेटपांजरा भागात मोठ्या प्रमाणात विजेच्या कडकडाटासह पाऊस जोरदार पावसाने हजेरी लावली.
पुन्हा पहाटे 5 च्या सुमारास आलेल्या पावसामुळे सगळ्यांची तारांबळ उडाली. तालुक्यातील काटोल शहर, ईसापूर, र्डोंगरगाव, झिलपा गोन्ही, चिखली, पठार, मालेगांव, गोन्ही, घुबडमेट, मेंडकी, मसखापरा, गंगालडोह ,बोरी, खैरी भागात जोरदार पाऊस पडल्याने आंबिया बहाराची संत्रा, मोसंबी फळे पडली. शिवाय टमाटर, मिरची, वांगे, गोभी या पिकांचे सुद्धा नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
वास्तविक यावेळी संत्रा, मोसंबी झाडांना मृग बहारा करिता तनावा दिली जातो. पण चांगलाच पाऊस झाल्याने मृग संत्रा मोसंबी फळ बागा फुटण्यावर सुद्धा परिणाम होऊ शकतो






