1 मे रोजी कस्तुरचंद पार्क येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण 

0
15

नागपूर दिनांक 30 एप्रिल (शहर प्रतिनिधी)

महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 62 वा वर्धापन दिनाचा मुख्य समारंभ कस्तुरचंद पार्क येथे 1 मे 2022 रोजी सकाळी 8 वाजता होणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांचे हस्ते ध्वजारोहण होणार आहे. या कार्यक्रमास सर्व नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळी 7.50 वाजता पालकमंत्री यांचे आगमन होईल. 8 वाजता पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते ध्वजारोहण व मानवंदना देतील. सकाळी 8.02 ते 8.10 विविध पथकांचे निरिक्षण करतील. 8.10 ते 8.20 महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देतील. सकाळी 8.20 ते 8.30 विविध पथकांचे पथसंचलन होईल. सकाळी 8.30 ते 8.45 बक्षिस वितरणाचा कार्यक्रम तसेच शासनाचे विविध विभागाचे पुरस्कार वितरण होईल. सकाळी 8.45 ते 8.55 प्रमुख अतिथी व उपस्थित निमंत्रितांच्या भेटी घेतील.

1 मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून संपूर्ण राज्यात ध्वजारोहणाच्या वेळी सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती देणारी जिल्हा माहिती कार्यालय निर्मित माहिती पत्रिका किंवा माहिती पुस्तिका वाटप करण्यात येणार आहे. जिल्ह्यांच्या ठिकाणी संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री ग्रामीण भागात लोकप्रतिनिधी किंवा प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या मार्फत या विकास योजनांचे संक्षिप्त स्वरुपात वाचनही करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here