उद्धव ठाकरेंचे पीएम मोदीनां तीनवेळा फोन, नंतर कॉल करा, मोदीजी निवडणुकीनंतर बोलतील

0
12

राज्यातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यममंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) गेल्या २४ तासांत तीनवेळा फोन केल्याचे वृत आले आहे.  (Maharashtra CM Uddhav Thackeray calls PM Narendra Modi three times a day on the backdrop of rising corona)

दुसरीकडे युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी उपरोधिकपणे केंद्र सरकारवर टीका केली आहे. सत्यजीत तांबे यांनी उपरोधिक ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. (Congress leader Satyajeet Tambe take jibe of Central Government over Remdesivir and Oxygen supply to Maharashtra)

सत्यजीत तांबे यांचं ट्विट 

सत्यजीत तांबे यांनी त्यांच्या ट्विटमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पीएमओ कार्यालयादरम्यान झालेला काल्पनिक संवाद मांडला आहे. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पीएमओ कार्यालयालामधील फोन करतात. ते पीएमओ कार्यालयााला महाराष्ट्राला ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हीरच्या पुरवठ्यासंदर्भात नरेंद्र मोदी यांच्याशी बोलायचं असल्याचं सांगतात. तर पीएमओ कार्यालयाकडून पीएम सध्या डू नॉट डिस्टर्ब मोडवर असल्याचं उत्तर येतं. यावर उद्धव ठाकरे पंतप्रधान कधी उपलब्ध होतील, असं विचारतात. त्यानंतर पीएमओ कार्यालय ते 2 मे नंतर सर्व राज्यांच्या निवडणुका पार पडल्यानंतर उपलब्ध होतील, असं सांगते. सत्यजीत तांबे यांनी या उपरोधिक ट्विटद्वारे केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here