गडकरींच्या पुढ़ाकाराने नागपुरला मिळणार रोज ४० टन ऑक्सिजन

0
11

नागपूरमधील रुग्णालयांत ऑक्सिजनची वाढती कमतरता लक्षात घेऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सीएसआर फंडमधून शनिवारी (१७ एप्रिल) विशाखापट्टणमच्या AMTZ मधून दोन हजार ऑक्सिजन कॅान्सन्ट्रेटर मागवले आहेत.

याशिवाय नितीन गडकरी यांच्या विनंतीला मान देऊन सज्जन जिंदल यांनी २० टन ऑक्सिजन वहन क्षमता असलेले दोन टॅंकर्स पूर्ण वेळ नागपूरसाठी दिले आहेत. या टॅंकर्समुळे ‘भिलाई स्टील प्लांट’मधून रोज ४० टन ऑक्सिजन नागपूरला मिळेल.

गडकरी यांनी शनिवारी ‘मुंबई डॅाल्बी प्लांट’च्या नितीन खरा यांच्याशीही चर्चा केली. त्यानुसार  खारा यांनी १००० रिकामे ऑक्सिजन सिलेंडर नागपूरला पाठवले आहेत. हे रिकामे सिलेंडर ‘भिलाई स्टील प्लांट’ला पाठवून ते रिफिल करून नागपूरला आणले जातील, ज्यामुळे नागपूरला अतिरिक्त ऑक्सिजनचा पुरवठा केला जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here