नागपूर/वाशिम दिनांक 21 एप्रिल (प्रतिनिधी)
नगरविकास व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांचे शुक्रवार, 22 एप्रिल, 2022 रोजी समृध्दी महामार्गाची पाहणी करण्यासाठी आगमन होत आहे.
शुक्रवार, दिनांक 22 एप्रिल रोजी शिंदे हे वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यातून समृद्धी महामार्गाच्या पाहणीस सुरुवात करतील. दुपारी तीन वाजता त्यांचे वायफळ (ता. हिंगणा) नागपूर येथे आगमन होईल. दुपारी सव्वातीन वाजता हेलिकॉप्टरने ठाणे शहराकडे प्रयाण करतील.






