यवतमाळ दि. 24 मार्च (प्रतिनिधी) :
दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते, त्याअनुषंगाने माहे एप्रिल महिन्यात सोमवार दि. 4 एप्रिल 2022 रोजी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील बळीराजा चेतना भवन (बचत भवन) येथे जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.
याप्रसंगी जिल्हाधिकारी अमोल येडगे जनतेच्या तक्रारी व गाऱ्हाने ऐकूण घेतील व त्यावर पुढील कार्यवाही करण्यात येईल.
लोकशाही दिनाला उपस्थित राहणाऱ्या अर्जदारांनी सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने हात वारंवार स्वच्छ करणे, सामाजिक अंतर ठेवणे, मास्क घालणे इत्यादी कोविड प्रतिबंधक उपायोजना कराव्या, असे निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी कळविले आहे.






