गेल्या 24 तासात नवीन पॉझिटिव्ह नाही : एक कोरोनामुक्त 

0
12

यवतमाळ दि. 11 मार्च, (प्रतिनिधी) :

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1766 बेड उपलब्ध

* ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह चार

 

गेल्या 24 तासात जिल्ह्यात नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले नाही तर एक जण कोरोनामुक्त झाले आहे. सध्या ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या चार असून सर्व रूग्ण गृहविलगीकरणात आहेत.

जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 239 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह नसल्याने सर्व 239 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 79065 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 77258 आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1803 मृत्यूची नोंद आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत आठ लाख 48 हजार 21 चाचण्या झाल्या असून त्यापैकी सात लाख 68 हजार 956 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 9.32 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 0.0 आहे तर मृत्यूदर 2.28 आहे.

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1766 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 7 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 1766 आहे. यापैकी सर्वच बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेड, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 857 बेड आणि 7 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 122 बेड शिल्लक आहेत.

नागरिकांनी मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या कोरोना त्रीसुत्री नियमांचे पालन करावे, तसेच कोरोनाचे लसीकरण पुर्ण करून स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here