राज्य शासनातर्फे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ज्योती कडू यांचा महिला दिनाला सत्कार

0
10

यवतमाळ दि. 08 मार्च (प्रतिनिधी) :

राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाद्वारे आज आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त यवतमाळच्या जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ज्योती प्रफुल्ल कडू यांचा मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हे दूरदृष्य प्रणालीद्वारे तर उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, विधानपरिषद उपसभापती निलम गोऱ्हे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थित होते.

कोविड कालावधीत केलेली विशेष कामगिरी, पालकमंत्री संदिपान भुमरे, जिल्हाधिकारी अमोल येडगे व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात कोविडमुळे विधवा झालेल्या महिला व अनाथ बालकांसाठी प्रशासनातर्फे राबविण्यात आलेल्या योजना व उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी तसेच महिला व बालकांवरील अत्याचारासंदर्भात करण्यात आलेली उल्लेखनीय कार्यवाही, बालविवाह रोकण्यात पुढाकार, बेकायदेशीरपणे बाळ दत्तक देणाऱ्यांवर केलेली कारवाई इत्यादी कामांची दखल शासनातर्फे घेण्यात आल्याचे ज्योती कडू यांनी सांगितले.

000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here