गेल्या 24 तासात 162 पॉझिटिव्ह ; 240 कोरोनामुक्त

0
14

यवतमाळ दि. 04 फेब्रुवारी, (प्रतिनिधी)

 

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1725 बेड उपलब्ध

* ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह 1488

 

गेल्या 24 तासात जिल्ह्यात 162 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले तर 240 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात 1450 व बाहेर जिल्ह्यात 38 अशी एकूण 1488 झाली आहे. त्यातील 41 रूग्ण रूग्णालयात तर 1447 गृहविलगीकरणात आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 78166 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 74884 आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1794 मृत्यूची नोंद आहे.

आज पॉझिटिव्ह आलेल्या 162 रूग्णांमध्ये 65 महिला व 97 पुरूष असून त्यात आर्णी तालुक्यातील 13, बाभुळगाव 17, दारव्हा पाच, दिग्रस दोन, घाटंजी नऊ, कळंब चार, महागाव एक, मारेगाव चार, नेर 12, पांढरकवडा 18, पुसद तीन, राळेगाव चार, वणी एक, यवतमाळ 61, झरी जामणी एक व इतर जिल्ह्यातील सात रूग्णांचा समावेश आहे.

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1725 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 7 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 1766 आहे. यापैकी 41 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 1725 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 41 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 746 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 857 बेडपैकी पुर्ण 857 बेड शिल्लक आणि 7 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 122 बेडपैकी पुर्ण 122 बेड शिल्लक आहेत.

कोरोना रुग्णसंख्येत सगळीकडे वाढ होत असून नागरिकांनी मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या कोरोना त्रीसुत्री नियमांचे पालन करावे, तसेच कोरोनाचे लसीकरण पुर्ण करून स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here