कोरोना लसीकरण :दुसऱ्या डोजचे काम वाढवा जिल्हाधिकारी यांच्या कोविड टास्क फोर्सला सुचना

0
12

यवतमाळ दि. 3 फेब्रुवारी :(प्रतिनीधी)

मागील २०-२२ दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना लसीकरणात दुसरा डोज देण्याचे काम खुप कमी झाले आहे. आपल्याकडे पहिल्या डोजचा अनुभव आहे, टिम उपलब्ध आहे, तरी स्थानिक सरपंच, पोलीस पाटील व प्रतिष्ठीत नागरिक यांचा सहभाग घेऊन व प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन योग्य नियोजनातून दुसऱ्या डोजचे काम वाढविण्यात यावे, अशा सुचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या.

कोरोना टास्क समितीची बैठक आज जिल्हाधिकारी अमोल येडगे व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रल्हाद चव्हाण, सर्व गट विकास अधिकारी तसेच दूरदृष्य प्रणाली द्वारे सर्व तहसीलदार, तालुका आरोग्य अधिकारी, नगर परिषदेचे मुख्याधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यात उमरखेड, पुसद, महागाव व आर्णी तालुक्यात लसीकरण कमी असल्याने एकूण टक्केवारीत संपूर्ण जिल्हा मागे पडत आहे. लसीकरण कमी असललेल्या ठिकाणी स्थानिकांच्या अडचणी जाणून त्यावर योग्य पर्याय काढावा. फिरते लसीकरण केंद्र, घरोघरी टिम पाठवून लसीकरण करावे. पुढील २० दिवसांत जिल्ह्यात दुसऱ्या डोजचे काम ५१ टक्के वरून ७५ टक्के व्हावे यासाठी सर्वांनी पुढाकार घेऊन काम करावे. आपल्या चांगल्या कामाची नोंद गोपनीय अहवालात घेण्यात येईल तसेच दुसऱ्या डोजमध्ये ७० टक्के लसीकरण झाल्यावर निर्बंधातूनही जिल्ह्याला शिथीलता मिळेल असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. १५ ते १७ वयोगटाचे लसीकरण व प्रिकॉशन डोज तसेच कोरोना टेस्टींग वाढविण्याबाबतही त्यांनी सुचना दिल्या.

बैठकीला संबंधीत अधिकारी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here