यवतमाळ : गेल्या 24 तासात 75 पॉझिटिव्ह ; 46 कोरोनामुक्त

0
9

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1718 बेड उपलब्ध 

 ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह 761

यवतमाळ दि. 18 जानेवारी (प्रतिनिधी) :

गेल्या 24 तासात जिल्ह्यात 75 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले तर 46 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात 738 व बाहेर जिल्ह्यात 23 अशी एकूण 761 झाली असून त्यातील 51 रूग्ण रूग्णालयात तर 710 गृहविलगीकरणात आहेत.

जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 849 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 75 अहवाल पॉझिटिव्ह असल्याने उर्वरित 774 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 74023 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 71474 आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1788 मृत्यूची नोंद आहे.

आज पॉझिटिव्ह आलेल्या 75 रूग्णांमध्ये 31 महिला व 44 पुरूष असून त्यात आर्णी तालुक्यात तीन, दिग्रस सात, कळंब दोन, पांढरकवडा चार, पुसद एक, उमरखेड एक, वणी तीन, यवतमाळ 46, झरी जामणी एक व इतर जिल्ह्यातील सात रूग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत आठ लक्ष तीन हजार 478 चाचण्या झाल्या असून त्यापैकी सात लक्ष 29 हजार 300 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 9.21 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 8.83 आहे तर मृत्यूदर 2.42 आहे.

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1718 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 7 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 1769 आहे. यापैकी 51 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 1718 बेड उपलब्ध आहेत.

यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 49 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 738 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 755 बेडपैकी 2 बेड उपयोगात असून 753 बेड शिल्लक आणि 7 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 227 बेडपैकी पुर्ण 227 बेड शिल्लक आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here