यवतमाळ : गेल्या 24 तासात 93 पॉझिटिव्ह ;40 कोरोनामुक्त

0
10

यवतमाळ दि. 17 जानेवारी (प्रतिनिधी) :

 

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1715 बेड उपलब्ध 

 ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह 732

 

गेल्या 24 तासात जिल्ह्यात 93 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले तर 40 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात 703 व बाहेर जिल्ह्यात 29 अशी एकूण 732 झाली असून त्यातील 54 रूग्ण रूग्णालयात तर 678 गृहविलगीकरणात आहेत.

जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 429 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 93 अहवाल पॉझिटिव्ह असल्याने उर्वरित 336 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 73948 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 71428 आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1788 मृत्यूची नोंद आहे.

आज पॉझिटिव्ह आलेल्या 93 रूग्णांमध्ये 30 महिला व 63 पुरूष असून त्यात आर्णी तालुक्यात दोन, दारव्हा 10, घाटंजी एक, कळंब एक, नेर 26, राळेगाव नऊ, वणी चार, यवतमाळ 33 व इतर जिल्ह्यातील सात रूग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत आठ लक्ष दोन हजार 547 चाचण्या झाल्या असून त्यापैकी सात लक्ष 28 हजार 529 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 9.21 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 21.68 आहे तर मृत्यूदर 2.42 आहे.

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1715 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 7 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 1769 आहे. यापैकी 54 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 1715 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 52 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 735 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 755 बेडपैकी 2 बेड उपयोगात असून 753 बेड शिल्लक आणि 7 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 227 बेडपैकी पुर्ण 227 बेड शिल्लक आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here