वाघाच्या हल्ल्यात महिला ठार

0
13

चंद्रपुर दिनांक 15 दिसंबर (विशेष प्रतिनिधि)

पोंभुर्णा वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्याची घटना समोर आली आहे. या भागात वाघाच्या हल्ल्यात महिला ठार झाल्याची घटना गुरुवारी सकाळी साडेपाच वाजता घडली. यामुळे परिसरात एकत खळबळ माजली आहे.

पोंभुर्णा तालुक्यात वाघाची दहशत कायम आहे. आज सकाळला जंगलात गेलेल्या महीलेवर वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात ती जागीच ठार झाली आहे. संध्या बावणे असे मृत महीलेचे नाव आहे. ती वेळवा येथिल रहीवासी आहे.

वेळवा येथील संध्या विलास बावने (३५) ही महिला पोंभुर्णा नियतक्षेत्रात गेली होती. त्यावेळी अचानक वाघाने हल्ला करीत तिला जागीच ठार केले. ती वेडसर असून अशीच भटकत जंगलात गेल्याची माहिती वनविभागाच्या सूत्रांनी दिली. पोंभुर्णा वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या कसरगट्टा गावातील शेतशिवारात वाघाने केलेल्या हल्ल्यात मागील महिन्याच्या २४ तारखेला एक महिला ठार झाल्याची घटना घडली होती. मात्र त्या ठिकाणापासून सदर भाग लांब असून हा हल्लेखोर दुसरा वाघ असल्याची पुष्टी सूत्रांनी जोडली.

मागील महीन्याभरापासून पोंभुर्णा तालुक्यात वाघाची दहशत सूरू आहे. महीन्याभरात वाघाने चार बळी घेतले आहे. दरम्यानच्या, काळात वनविभागाने गस्त वाढविली असून वाघाच्या हालचालीवर नजर ठेवली होती. मात्र आज पुन्हा वाघाने हल्ला करीत महीलेचा बळी घेतला. घटनेची माहीती मिळताच वनविभाग, पोलीस विभाग घटनास्थळी दाखल झाले. या घटनेने तालुक्यात दहशत पसरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here