विधान परिषद निवडणूक : दुपारी एक वाजेपर्यंत 16% मतदान

0
14

वाशिम/अकोला/बुलढाणा (दिनांक 10 डिसेंबर)

अकोला, बुलढाणा आणि वाशिम या तीन जिल्ह्यात विधानपरिषदेची निवडणूक होत आहे. यासाठी आज मतदान होत असून यात ८२२ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. यात महाविकास आघाडीकडून गोपीकिशन बाजोरिया आणि भारतीय जनता पक्षाकडून वसंत खंडेलवाल हे दोन उमेदवार रिंगणात उभे असून या दोघांमध्ये लढत होणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनही सज्ज आहे.

दरम्यान, सकाळी ८ वाजता मतदानाला सुरुवात झाली असून दुपारी 1 वाजेपर्यंत जवळपास 16% मतदान झाले आहे त्यामुळे नेमका विधानपरिषदेचा गुलाल हा कोणाच्या खांद्यावर पडणार आहे ते पाहणं आता महत्त्वाचं आहे.

 

अकोला निवडणूक

अकोला जिल्हा परिषदमधले ६० सदस्य

अकोला महानगरपालिकेतले ८१ नगरसेवक

अकोट नगर परिषदचे ३६ सदस्य

तेल्हारा नगरपरिषदचे १९ सदस्य

बाळापुर नगर परिषदचे २६ सदस्य

पातूर नगर परिषदचे १९ सदस्य

मुर्तीजापुर नगर परिषदचे २६ सदस्य

बार्शिटाकळी नगरपरिषदचे २० असे एकूण १४० सदस्य यात मतदान करणार आहेत.

 

वाशिम जिल्ह्यातील निवडणुका

वाशिम जिल्हा परिषदेचे ५८ सदस्य

वाशिम नगर परिषदचे ३४ सदस्य

कारंजा नगर परिषदचे ३२ सदस्य

मंगळापूर नगरपरिषदेचे २१ सदस्य

रिसोड नगरपरिषदचे २३ सदस्य असे एकूण ११० सदस्य आज मतदान करणार आहेत

 

बुलढाणा जिल्ह्यातील निवडणुका

बुलढाणा नगर परिषदमधील २१ सदस्य

चिखली नगर परिषदमधील ३० सदस्य

देऊळगाव राजा नगर परिषदमधील २१ सदस्य

सिंदखेड नगर परिषदमधील १९ सदस्य

लोणार नगरपरिषदमधील २० सदस्य

मेहकर नगर परिषदमधील २७ सदस्य

खामगाव नगर पालिकामधील ३७ सदस्य

शेगाव नगर पालिकेतील ३२ सदस्य

जळगाव जामोद नगरपरिषदेचे २१ सदस्य

नांदुरा नगरपालिकाचे २६ सदस्य

मलकापूर नगरपरिषदचे ३२ सदस्य अशा एकूण अकरा नगरपरिषदेचे २९६ नगरसेवक आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here