महाराष्ट्र सरकारने लगेच लॉकडाउन लावू नये आम्हाला विचारात घ्यावे: फडणविस

0
12

सध्या राज्यात कोरोनामुळे लगेच लॉकडाऊन लावावा, अशी परिस्थिती नाही. निर्बंधाबाबत सरकारने आम्हाला विचारात घ्यावे. एक्सपर्टची मते घेऊन निर्णय घ्यावा, असे आवाहन सोमवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.

फडणवीस म्हणाले की, ही कोणती संधी आहे हे मला समजलं नाही. कोरोनाच्या काळात देशातील सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात झाले. ३५ टक्के देशातील मृत्यू महाराष्ट्रात आहेत. ४० टक्के मृत्यू राज्यात आहेत. सर्वाधिक अफेक्टेड राज्य महाराष्ट्र आहे. हे सर्व होत असताना शेतकऱ्यांना मदत नाही. बाराबलुतेदारांना नवा पैसा दिला नाही. इतर छोट्या राज्यांनी बलुतेदारांना मदत केली. राज्य सरकारने एकाही शेतकऱ्याला मदत दिली नाही.

आमच्या काळात 15 हजार कोटी विम्याचे मिळाले. यांच्या काळात 500 कोटीही मिळाले नाहीत. त्यामुळे संधीचे रुपांतर कशात, हे मला कळत नाही. मला एवढं लक्षात आलं की संकटात काही संधी साधू या सरकारमध्ये होते. त्यांनी संधी साधली आणि आपले खजाने भरले. यापेक्षा काही रुपांतर दिसले नाही, असा आरोप त्यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here